*💫कणकवली दि.०७-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसा. लिमिटेड या शेतकरी सहकारी संस्थेच्या रिक्त झालेल्या चेअरमनपदच्या पोटनिवडणुकीत संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विजय जयराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद विश्वनाथ निग्रे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आज सहकार खात्याच्या वतीने पोटनिवडणूक घेण्यात आली होती. प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक कणकवली यांच्या प्रमुख उपस्थिती घेण्यात आलेल्या निवडणुकीत सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक विजय जयराम देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रभाकर पोमेडकर यांच्या शुभहस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन तथा जि. प. सदस्य रवींद्र जठार, संचालिका तथा पं. स.सदस्या तृप्ती माळवदे, संचालक एकनाथ कोकाटे, इस्माईल मुकादम, श्रीधर गुरव, मंगेश गुरव, सुरेंद्र कोरगांवकर, बलराम राणे, रिना ब्रम्हदंडे संस्थेचे सचिव अतुल कर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन विजय देसाई यांचे प. पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणचे संचालक प्रवीण लोकरे, संतोष पाटणकर सेक्रेटरी वामन पेडणेकर यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. “खारेपाटण सोसायटीच्या चेअरमन पदी माझी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. येथील सभासदांनी व खारेपाटण पंचक्रोशीतील जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे. तो निश्चितच सार्थकी लावेन व सर्व सहकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असून शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन विजय देसाई यांनी यावेळी सांगितले. तर संस्थेचे माजी चेअरमन कै. प्रमोद निग्रे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
खारेपाटण गटविकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी विजय देसाई
