*अखेर ‘त्या ‘ वनपालाची बदली

*सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांच्या मागणीला यश

*💫सावंतवाडी दि.०७-:* माणगाव येथील वनपालाची बदलीपास घोटाळा प्रकरणी अखेर कुडाळ येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी येथील सावंतवाडी वनविभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडत या घोटाळा प्रकरणी त्याचाकडील पदभार काढून घेण्याची मागणी केली होती. या बदलीने त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. माणगाव वनपाल यांनी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून व त्यावर खोट्या सह्या करून आर्थिक लाभासाठी बनावट पास मिळवून लाकूड वाहतुक केल्याचे बरेगार यांनी माहीतीच्या अधिकारात पुढे आणले होते. त्यांनी याबाबत वनविभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, आवश्यक सहकार्य न मिळाल्याने त्यांनी याप्रकरणी अखेर कुडाळ पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्याकडून चौकशी होऊन अहवाल मिळणेबाबतचे पत्र वनकार्यालयास प्राप्त होऊन सुमारे ४० दिवसाचा कालावधी लोटला तरीही सर्व पुराव्याचे कागदपत्र कार्यालयातच उपलब्ध असतानाही संबंधित वनपालाच्या चौकशीमध्ये चाल ढकल व वेळकाढूपणा केला जात होता. त्यांचेविरुद्ध उपलब्ध असलेले बनावट कागदपत्रे पाहता त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल होणेस ते पात्र आहेत. त्यामूळे सदर कारवाई करणेसाठी पोलीस निरीक्षक कुडाळ यांचेकडे त्वरीत शिफारस करावी. वनपाल माणगाव हे त्यांचे कार्यालयातील पुराव्याच्या दृष्टीने उपलब्ध कागदपत्र गायब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कडील वनपाल माणगाव या पदाचा कार्यभार त्वरित काढून घ्यावा, अशी मागणी बरेगार यांनी केली होती.

You cannot copy content of this page