सरपंच हेमंत मराठे यांचा स्तुत्य उपक्रम
*💫सावंतवाडी ता.०७-;* सरपंच हेमंत मराठे यांच्याकडून गावातील दशावतारी कलावंतांना धान्य वाटप करण्यात आले.गेल्या वर्षीपासून कोरोना महामारी मुळे दशावतारी नाट्यप्रयोग पूर्णपणे बंद झाल्याने या दशावतार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. सेवाभावी संस्था, राजकीय नेते, दानशूर व्यक्ती यांनी आपापल्या परीने या दशावतार कलावंतांना मदतीचा हात पुढे केला. मळेवाड कोंडुरे गावातील व्यावसायिक दशावतारी नाट्य प्रयोग करणाऱ्या कलाकारांना ग्रामपंचायत सरपंच हेमंत मराठे यांनी उपलब्ध केलेले धान्य माजी पंचायत समिती सदस्य लाडोबा केरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दशावतारी कलावंताना मराठे यांनी धान्यवाटप करून दशावतार कलावंताच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला, याबद्दल दशावतार कलाकारांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी ग्रा प सदस्य मधुकर जाधव, ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर, अमित नाईक, ज्ञानेश्वर मुळीक, संतोष पार्सेकर, वैभव मोरुडकर, मिलन पार्सेकर, वामन माळकर, मिलिंद मुळीक, बाबल नाईक, न्हांगु नाईक उमेश गावडे, सुनील मेस्त्री,लिपिक सखाराम जाधव, डाटा ऑपरेटर किरण कुंभार आदी उपस्थित होते.
