बंद काजू कारखान्यात आढळलेल्या अजगराच्या 9 पिल्लांना मिळाले जीवदान

मदतीसाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु टीम सरसावली

*💫वेंगुर्ला दि.०७-:* तालुक्यातील आडेली भटवाडी येथील दिलीप गावडे यांना बंद काजुच्या कारखान्यात दिसून आलेल्या अजगराची नऊ पिल्लांना कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदूर्गच्या टीमने पकडले. आणि वनरक्षकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडून या पिल्लांना जीवदान दिले. आडेली येथील दिलीप गावडे आसरा घेण्यासाठी त्या काजू कारखान्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी त्यांना विटांच्या ढिगाऱ्यावर साप दिसून आला तर काही अंतरावर दुसरा साप आढळला. त्यांनी लगेचच याची माहिती कोकण वाईल्ड लाईफ चे दिपक दुतोंडकर यांना दिली. तत्काळ दुतोंडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले तर ती अजगराची पिल्ले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ती पकडल्यानंतर त्यांनी कोकण वाईल्ड लाईफ च्या अध्यक्षांना दुरध्वनी वरुन या घटनेची माहिती दिली. तर दिलीप गावडे यांनी या पिल्लांना लांब जंगलात सोडून देण्याची आग्रहाची मागणी केली. पावसाळ्यात जुन,जुलै महिन्यात सापाची पिल्लं बाहेर येतात. या कारणानं कोकण वाईल्ड लाईफ ची टीम नेहमी कार्यरत असते. ही टीम घटनास्थळी दाखल झाली, त्यांनी पिल्लांना पाहिल्यावर ती चार ते पाच दिवसांची असावी असा अंदाज व्यक्त केला. त्यांनी याची माहिती स्थानिक (मठ) वनविभागाला दिली.आणि रेस्कु आँपरेशन सुरू केलं. तब्बल नऊ अजगराची पिल्ले रेस्क्यु टीम ला पकडण्यात यश आलं. यावेळी वनविभाग मठ वनरक्षक श्री.विष्णु नरळे तर कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्ग चे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, महेश राऊळ, दिपक दुतोंडकर आदी या पकड मोहिमेत सहभागी झाले होते. पिल्लांना पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून त्यांना जीवदान देण्यात आले.

You cannot copy content of this page