नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्था उर्जितावस्थेत आणणार

कारखान्याच्या पुनर्बांधणीसाठी १ कोटी भांडवलाची आवश्यकता:आत्माराम राऊळ

*सावंतवाडी :* नेमळे सहकारी कौल उत्पादक संस्थेला आधुनिकतेची जोड देत उर्जितावस्था आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत कौल कारखान्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. १०० कुटुंबांचा चरितार्थ चालणाऱ्या कारखान्याची पुनर्बांधणी करण्यासाठी १ कोटी भांडवलाची आवश्यकता असल्याचे कौल कारखान्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संचालक मंडळाच्या सभेनंतर बुधवारी ७ जूनला जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत यांनी या कारखान्याची पाहणी केली. शासनाकडून याबाबत मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सावंत यांनी कारखाना पाहणी दरम्यान सांगितले आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक विकास सावंत, कौल कारखान्याचे अध्यक्ष आत्माराम राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page