कणकवली -बांधकरवाडी येथील दिनकर राणे यांचे निधन

*💫कणकवली दि.०७-:* बांधकरवाडी येथील रहिवासी दिनकर भास्कर राणे (७३) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.कणकवली बाजारपेठेतील उचले किरणा दुकान येथे ते कामाला होते.आयुर्वेदिक औषधउपचार कशा प्रकारे घ्यावयाचा याची इतंबूत माहिती त्यांना होती.ह्समुखत व विनोदी स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते.यासोबतच बांधकारवाडी येथील धार्मिक व सामाजिक उपक्रमात त्याचा नेहमी सहभाग होता.त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चत पत्नी,मुलगा,मुलगी,सून,भाव,भावजय,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. रत्नागिरी येथे रेल्वेत सेवा बजावणारे विवेक राणे यांचे काका तर भास्कर राणे यांचे ते वडील होत.बुधवारी सकाळी माऊली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page