सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २० रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी १, सावंतवाडी ३, न्यू खासकीलवाडा १, सालईवाडा १, शिरोडा नाका १, जूनाबाझार २, गरड १, चीतारआळी २, बाहेरचावाडा १ तर…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 160 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 40 हजार 726 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 160 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

हाती काहीच न लागल्याने बंद बंगला फोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

*💫सावंतवाडी दि.१३-:* शहरातील माठेवाडा येथील एक बंद बंगला फोडून आतमध्ये प्रवेश करत चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न त्या बंगल्यात रोकड व दागिने न सापडल्याने फसला आहे. रविवारी सदर घटना उघडकीस येताच घरमालकाने पोलिसात खबर दिली. यावेळी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार महेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. चार दिवसांपूर्वी सालईवाडा येथील आशीर्वाद हार्डवेअर…

Read More

मातृत्व आधार फाउंडेशनने कार्य समाजासाठी दिशादर्शक

वायरी येथे उद्योजक सागर वाडकर यांनी काढले गौरवोद्गार *💫मालवण दि.१३-:* माझी कर्म भूमी ही पुणे असली तरी मातृभूमी मालवण असल्याने येथील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी माझ्या परीने सामाजिक कार्ये करत असतो.गेले वर्षभर मालवणच्या मातृत्व आधार फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी स्वीकारून जे कार्य सुरू केले आहे ते समाजासाठी दिशादर्शक आहे असे गौरवोद्गार उद्योजक…

Read More

वेंगुर्ला येथे १ ऑगस्ट रोजी लोकअदालत

*💫वेंगुर्ला दि.१३-:* उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिधुदुर्ग-ओरोस यांन दिलेल्या निर्देशांला अनुसरुन वेंगुर्ला दिवाणी न्यायालय व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमीत कमी…

Read More

असलदे ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांना कोविड विमा संरक्षण कवच

*💫कणकवली दि.१३-:* कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याना कोविड विमा संरक्षण कवच ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले आहे . मधुसूदन परब ,प्रकाश वाळके , सत्यवान घाडी या तीन कर्मचारी यांचा १ लाख प्रमाणे विमा संरक्षण कवच देण्यात आले असून पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी,संचिता नरे,प्रतिभा खरात, वंदना…

Read More

नाणार प्रकल्पाचे समर्थन करत असलदे ग्रा.पं.ने केला ठराव

ना.नारायणराव राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव *💫कणकवली दि.१३-:* कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मासिक सभेत या नाणार प्रकल्पाच्या समर्थन करीत ठराव मंजूर करण्यात आला आहे हा ठराव नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात येणार असल्याचे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सांगितले. कोकणात विषेशत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार उपलब्ध नाही मोठ्या कंपनी नाही यामुळे…

Read More

पावसाच्या तडाख्याने आंब्याचे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान

म्हापण चव्हाणवाडी येथील घटना *💫कुडाळ दि.१३-:* गेले दोन ते तीन दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसाने म्हापण चव्हाण वाडी येथील अर्जुन बुधाजी म्हापणकर/ बाळकृष्ण अर्जुन(चव्हाण) म्हापणकर यांच्या राहत्या घरावर आज सकाळी सुमारे आठ वाजता घराच्या मागील बाजूला असलेल्या आंब्याचे झाड उन्मळून पडून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही .आंब्याचे झाड घरावर…

Read More

सिस्टर सिल्विया आल्मेडा यांचा उभादांडा वासियांतर्फे सत्कार

*💫वेंगुर्ले दि.१३-:* सिस्टर ( माद्री ) सिल्विया आल्मेडा यांचा उभादांडा वासियांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. आल्मेडा वाडीतील लोकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. उभादांडा गावातील सिस्टर (माद्री) सिल्विया आल्मेडा यांचे हल्लीच उभादांडा गावात आगमन झाले आहे. त्या सध्या गुजरात मेसाना तालुक्यात फातिमा कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत असून ३० मे २०२० रोजी त्यांना धर्मगुरु ( भिशप ) थॉमस डामरे…

Read More

मडुरा-सातोसे मार्गावरील पूल पाण्याखाली

रुग्णवाहिकेसह शेकडो वाहने अडकली : 26 रोजी उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा *💫बांदा दि.१३-:* दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत जोरदार आगमन करत सर्वत्र पाणीच पाणी केले. मडुरा माऊली मंदिर जवळ असलेले पूल पाण्याखाली गेल्याने मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग ठप्प झाला होता. पुलावर सुमारे चार फूट पाणी आल्यामुळे रुग्णवाहिकेसह शेकडो वाहने अडकली होती. वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत…

Read More
You cannot copy content of this page