*💫वेंगुर्ला दि.१३-:* उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिधुदुर्ग-ओरोस यांन दिलेल्या निर्देशांला अनुसरुन वेंगुर्ला दिवाणी न्यायालय व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी असून त्यातून त्यांना कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करुन वादपूर्व प्रकरण तडजोडीने मिटविण्यात यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांना न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये लोकअदालीपूर्वी आपले प्रकरणांची पूर्व बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांच्या करीता कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते ११ व दुपारी २ ते २.३० वाजता यावे. त्याकरिता संबंधितांनी दिवाणी न्यायलाय, वेंगुर्ला (०२३६६-२६२७०७) येथे संफ साधावा. ज्या पक्षकारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायतकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत असे आवाहन न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील यांनी केले आहे.
वेंगुर्ला येथे १ ऑगस्ट रोजी लोकअदालत
