वायरी येथे उद्योजक सागर वाडकर यांनी काढले गौरवोद्गार
*💫मालवण दि.१३-:* माझी कर्म भूमी ही पुणे असली तरी मातृभूमी मालवण असल्याने येथील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी माझ्या परीने सामाजिक कार्ये करत असतो.गेले वर्षभर मालवणच्या मातृत्व आधार फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी स्वीकारून जे कार्य सुरू केले आहे ते समाजासाठी दिशादर्शक आहे असे गौरवोद्गार उद्योजक सागर वाडकर यांनी येथे बोलताना केले मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे यांच्या वायरी येथील निवासस्थानी गरजू व्यक्तीना छत्र्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी श्री वाडकर हे बोलत होते यावेळी उद्योजक सागर वाडकर, संस्थापक संतोष लुडबे, सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर, सौ. रश्मी लुडबे, नगरसेविका पूजा करलकर, संतोष नागवेकर, राजन कुमठेकर, प्रमोद मोहिते, दादा वेंगुर्लेकर, संतोष नाटेकर, सुरेश बापर्डेकर, बाबा मोरजकर, आशा सेविका आकांक्षा गोसावी, हर्षदा तोंडवळकर, अर्चना तोंडवळकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी विनायक कोळंबकर यांनी प्रास्ताविक केले सामाजिक बांधिलकी जपत सागर वाडकर यांनी केलेल्या दातृत्वाबद्दल मातृत्व आधार फाउंडेशन तर्फे त्यांचे कौतुक व आभार मानण्यात आले. यावेळी सागर वाडकर यांनी मातृत्व आधार फाउंडेशन संस्था आदर्शवत असे सामाजिक कार्य करत असून त्यांच्या या कार्यात मी छोटासा हातभार लावला आहे. देवबाग गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले तर संस्थापक संतोष लुडबे म्हणाले, मातृत्व आधार फाउंडेशन संस्था स्थापन झाल्यापासून गेल्या वर्षभरात संस्थेमार्फत आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबविले. ही संस्था म्हणजे एक कुटुंब बनले आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे संस्था उत्तम काम करत असून सागर वाडकर यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींची साथ लाभल्याने संस्थेच्या कार्याला आणखी बळ मिळत आहे. यापुढेही ही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत काम करत राहील, असेही लुडबे म्हणाले. यावेळी पूजा करलकर यांनीही भाषण करत वाडकर व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी संस्थेच्या वतीने उद्योजक सागर वाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
