हाती काहीच न लागल्याने बंद बंगला फोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

*💫सावंतवाडी दि.१३-:* शहरातील माठेवाडा येथील एक बंद बंगला फोडून आतमध्ये प्रवेश करत चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न त्या बंगल्यात रोकड व दागिने न सापडल्याने फसला आहे. रविवारी सदर घटना उघडकीस येताच घरमालकाने पोलिसात खबर दिली. यावेळी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार महेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. चार दिवसांपूर्वी सालईवाडा येथील आशीर्वाद हार्डवेअर दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला होता. त्याचाही तपास अद्याप लागलेला नाही.

You cannot copy content of this page