असलदे ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांना कोविड विमा संरक्षण कवच

*💫कणकवली दि.१३-:* कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याना कोविड विमा संरक्षण कवच ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले आहे . मधुसूदन परब ,प्रकाश वाळके , सत्यवान घाडी या तीन कर्मचारी यांचा १ लाख प्रमाणे विमा संरक्षण कवच देण्यात आले असून पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी,संचिता नरे,प्रतिभा खरात, वंदना हडकर, ग्रामसेवक आर.डी सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page