ना.नारायणराव राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव
*💫कणकवली दि.१३-:* कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मासिक सभेत या नाणार प्रकल्पाच्या समर्थन करीत ठराव मंजूर करण्यात आला आहे हा ठराव नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात येणार असल्याचे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सांगितले. कोकणात विषेशत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार उपलब्ध नाही मोठ्या कंपनी नाही यामुळे येथे बरीच तरुण मंडळी बेकार झाले आहे जर नाणार प्रकल्प व विजयदूर्ग पोर्ट प्रकल्प झाल्यास येथील कित्येक तरूण पिढीच्या रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटेल व येथील तरूण नोकरीच्या शोधात मुंबई, गोवा,पुणे जावे लागणार नाही म्हणून नाणार प्रकल्प हवा आहे. या मासिक सभेत नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायणराव यांचा अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी, संचिता नरे ,प्रतिभा खरात, वंदना हडकर, ग्रामसेवक आर डी सावंत आदी उपस्थित होते .
