म्हापण चव्हाणवाडी येथील घटना
*💫कुडाळ दि.१३-:* गेले दोन ते तीन दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसाने म्हापण चव्हाण वाडी येथील अर्जुन बुधाजी म्हापणकर/ बाळकृष्ण अर्जुन(चव्हाण) म्हापणकर यांच्या राहत्या घरावर आज सकाळी सुमारे आठ वाजता घराच्या मागील बाजूला असलेल्या आंब्याचे झाड उन्मळून पडून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही .आंब्याचे झाड घरावर पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात घराच्या पाठीमागील भागाचे पत्रे तसेच फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरावर आंब्याचे झाड पडल्याची माहिती मिळताच व म्हापण चव्हाणवाडीतील ग्रामस्थ तसेच म्हापण ग्रामपंचायत सरपंच अभय ठाकूर व उपसरपंच अशोक पाटकर तसेच ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच तलाठी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पंचनामा करण्यास सांगितले. यावेळी तलाठी श्रीमती गावकर मॅडम यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी करून नुकसानीचा तात्काळ पंचनामा केला.
