सिस्टर सिल्विया आल्मेडा यांचा उभादांडा वासियांतर्फे सत्कार

*💫वेंगुर्ले दि.१३-:* सिस्टर ( माद्री ) सिल्विया आल्मेडा यांचा उभादांडा वासियांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. आल्मेडा वाडीतील लोकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. उभादांडा गावातील सिस्टर (माद्री) सिल्विया आल्मेडा यांचे हल्लीच उभादांडा गावात आगमन झाले आहे. त्या सध्या गुजरात मेसाना तालुक्यात फातिमा कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत असून ३० मे २०२० रोजी त्यांना धर्मगुरु ( भिशप ) थॉमस डामरे यांनी त्यांना दिक्षा दिली. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजगाव सेंट फ्रान्सिस जेवीयर स्कूलमध्ये तर पुढील शिक्षण गोवा म्हपसा येथे डॉन बॉस्को येथे व एक वर्ष मुबंई अंधेरी फातिमा आश्रममध्ये झाले. सहा वर्षे तपस्वी करून त्यांना दिक्षा प्रधान करण्यात आली. येत्या काही दिवसात परत गुजरातमध्ये जाणार असून गावातील लोकांनी त्यांचे स्वागत व सर्वानी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा यांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल आपले विचार मांडले.।आपले विचार मांडताना सिस्टर सिल्विया यांनी गोरगरीब, तसेच आश्रम मधील लोकांची सेवा करा फादर व सिस्टर होण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपण आपल्या समाजासाठी, गावासाठी आणि देशासाठी सदैव प्रार्थना करेन असे सांगून सत्कार केल्या बद्दल आभार मानले.

You cannot copy content of this page