*💫सावंतवाडी दि.१३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात भटवाडी १, सावंतवाडी ३, न्यू खासकीलवाडा १, सालईवाडा १, शिरोडा नाका १, जूनाबाझार २, गरड १, चीतारआळी २, बाहेरचावाडा १ तर ग्रामीण भागात मळगाव १, कोलगाव ३, माडखोल २, कारिवडे १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २३३ रुग्ण सक्रिय आहेत.
