जि. प. सदस्या मंदाताई शिवलकर यांच्यासह शाखाप्रमुख ,सरपंच व शिवसैनिक भाजपात

राजापूर येथे रिफायनरीचे समर्थन;प्रमोद जठार यांनी केले स्वागत *💫कणकवली दि.१९-:* राजापूर येथे रिफायनरी समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्या सौ मंदाताई शिवलकर यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख सरपंच व शिवसैनिकानी भारतीय जनता पक्षात प्रदेश चिटणीस माजी आम. प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, राजापूर तालुकाध्यक्ष गुरव, श्री अनिल…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद आंबोली मुळवंदवाडी शाळेचे यश

दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई *💫आंबोली दि.१९-:* आंबोली येथील जिल्हा परिषद आंबोली मुळवंदवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत घवघवीत यश संपादन करत दोन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व एक कांस्यपदक पटकाविले. या परीक्षेत कुमार राजवीर विजय शिंदे (पहिली) ९८ टक्के गुण प्राप्त करत सुवर्ण पदक, कुमार विघ्नेश अरूण पाटील (तिसरी) ९६ टक्के गुणांसह…

Read More

दळवी महाविद्यालयात विजिगीषु’ उपक्रम साजरा

*💫कणकवली दि.१९-:* दळवी महाविद्यालयात ‘विजिगीषु’ हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. विद्यार्थ्यांचा कलागुणांचा विकास व्हावा, त्यांना युथ फेस्टिव्हल मध्ये यश मिळवता यावे म्हणून सलग पाच दिवस विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात, ‘गार्गी डे’ ने झाली. या दिवशी महिला सबलीकरणावर या विषयावर डॉ. शिल्पा सप्रे (इंग्रजी विभाग प्रमुख डी बी….

Read More

मधुसूदन नानिवडेकर यांना शब्दवैभव साहित्य समूह,सांगलीच्यावतीने शब्द श्रद्धांजली

*💫कणकवली दि.१९-:* गझलभूषण कै. मधुसूदन नानिवडेकर यांना सांगली येथील शब्दवैभव साहित्य समूहातर्फे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या आठवणी जागवून व त्यांच्याच कविता, गझल सादर करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. साहित्यिक आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी नानिवडेकर यांच्या आठवणी सांगितल्या त्याचबरोबर ज्येष्ठ गझलकार सुधीर इनामदार, नरहर कुलकर्णी, प्रवीण…

Read More

तांबोळी-असनिये मार्गावर धोकादायक खड्डे

रस्ता मोजतोय शेवटच्या घटका : वाहनचालक करताहेत तारेवरची कसरत;ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा *💫बांदा दि.१९-:* असनिये व घारपी गावात अनेक पर्यटन स्थळे असल्याने सदैव वाहनांची वर्दळ सुरू असते. बांदा-असनिये मार्गावरील तांबोळी ते असनिये दरम्यान रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. आठ दिवसांतून एक तरी अपघात खड्डे वाचविताना होत…

Read More

वृक्षलागवड भविष्यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी

रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महावृक्षारोपण व संवर्धन अभियान उत्साहात *💫कणकवली दि.१९-:* मुंबई विद्यापीठ स्थापना दिवस निमित्त निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनाचा संकल्प करत, रोटरी क्लब, कणकवली सेंट्रल आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावृक्षारोपण व संवर्धन अभियान उत्साहात पार पडले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग…

Read More

निलेश मानकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पणदूर येथील सविता आश्रमाला केली मदत *💫कणकवली दि.१९-:* निलेश मानकर यांनी आपल्या वाढदिवस वृद्धासोबत साजरा केला.आश्रमातील वृद्धांचा एका दिवसाच्या जेवणाचा खर्च,कपडे तसेच जीवनावश्यक वस्तू जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम पणदूर यांच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्त केल्या. वाढदिवस म्हंटला की पार्टी,मौज मजा,कुटुंब व मित्र परिवारासोबत केक कापून जंगी सेलिब्रेशन केले जाते. परंतु निलेश मानकर यांनी मात्र आपला…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प…

Read More

जिल्ह्यात पावसाचे शतक कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१९-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 119(2145), सावंतवाडी –…

Read More

झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत वाहतुकीस सुरळीत

मुसळधार पावसामुळे मळगाव रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर कोसळले होते झाड *💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी ७.३० च्या सुमारास मळगाव रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने मार्ग ठप्प झाला होता. दरम्यान वाहतुकीचा विचार करता हा महत्वाचा मार्ग असल्याने झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.

Read More
You cannot copy content of this page