वृक्षलागवड भविष्यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी

रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महावृक्षारोपण व संवर्धन अभियान उत्साहात

*💫कणकवली दि.१९-:* मुंबई विद्यापीठ स्थापना दिवस निमित्त निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलनाचा संकल्प करत, रोटरी क्लब, कणकवली सेंट्रल आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावृक्षारोपण व संवर्धन अभियान उत्साहात पार पडले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग या वृक्षारोपण अभियानाचे आयोजन कणकवली कॉलेज, कणकवली आणि रोटरी क्लब, कणकवली सेंट्रल यांच्यातर्फे करण्यात आले होते. अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील कळसुली, हळवल, नरडवे, दिगवळे, हुबरट, साकेडी, गोपुरी आश्रम, वागदे ग्रामपंचायत, हरकुळ, असरोंडीसह कणकवलीमध्ये पोलीस स्टेशन, स्वयंभू मंदिर, मुर्डेश्वर मैदान, कणकवली कॉलेज रेल्वेस्टेशन या ठिकाणी पर्यावरण पूरक जांभूळ, सुरंगी, जाम, पेरू, गुलमोहर, बहावा, बेल, रक्तचंदन, कोकम यासारख्या वृक्षांचे रोपण करून संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. अभियानासाठी वृक्षवल्ली रोपवाटिका वागदेचे व्ही.के.सावंत यांनी सर्व रोपे उपलब्ध करून दिली. या प्रसंगी एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. महावृक्षारोपण व संवर्धन अभियानाचे आयोजन रोटरी क्लब, कणकवली सेंट्रल अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे व कणकवली कॉलेज प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब उपाध्यक्ष रवी परब, सचिव वर्षा बांदेकर , खजिनदार रवी मुसळे रोटरीयन ऍड. दीपक अंधारी, दीपक बेलवलकर, मेघा गांगण, दिशा अंधारी, महिंद्र मुरकर , संतोष कांबळे . डॉ. प्राजक्ता तेली- नाचणे, वीरेंद्र नाचणे, स्नेहलता राणे, उमा परब , जगदीश राणे , रमेश मालविया , गुरुनाथ पावसकर, लहू पिळणकर, डॉ स्वप्निल राणे, धनंजय कसवनकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा सुरेश पाटील, प्रा विनया रासम, प्रा सागर गावडे यांनी केले. कणकवली तालुक्यातील 15 गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक डेव्हीड फर्नांडिस, मंजिरी खरात, मिहीर तांबे, दिव्या भोगटे, चिंतामण साळगावकर, रामचंद्र सावंत, शुभम देसाई, तेजस गुरव, हर्षदा कुबल, विठ्ठल राणे, महेश धुरी, पल्लवी करंबेळकर, शैलेश गावडे, अजय सावंत, श्रद्धा पाटकर, पूजा मुंज, रजत कदम, श्रेया फडतरे, रिद्धी मोरवेकर, सर्वेश सावंत, भक्ती सावंत, सुशांत कदम, निखिल पांगम, प्रकाश चव्हाण यांनी गाव परिसरातील स्वयंसेवकांना एकत्र करत वृक्षारोपणाची जबाबदारी पार पाडली. अभियानामध्ये मध्ये 160 स्वयंसेवक सहभागी झाले. सततधार पाऊस असताना चिखलामध्ये भरलेल्या कपड्यांसह वृक्षारोपण करत तरुणाईने नाविन्यपूर्ण विचार आणि सामाजिक कर्तव्याचा एक नवीन आदर्श निर्माण केला, त्याबद्दल कणकवली कॉलेज, पदाधिकारी कणकवली नागरिक यांच्याकडून स्वयंसेवकांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page