पणदूर येथील सविता आश्रमाला केली मदत
*💫कणकवली दि.१९-:* निलेश मानकर यांनी आपल्या वाढदिवस वृद्धासोबत साजरा केला.आश्रमातील वृद्धांचा एका दिवसाच्या जेवणाचा खर्च,कपडे तसेच जीवनावश्यक वस्तू जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम पणदूर यांच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्त केल्या. वाढदिवस म्हंटला की पार्टी,मौज मजा,कुटुंब व मित्र परिवारासोबत केक कापून जंगी सेलिब्रेशन केले जाते. परंतु निलेश मानकर यांनी मात्र आपला वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांन समवेत साजरा केला. यावेळी त्यांनी या वृद्धाच्या एकदिवसीय जेवणाच्या खर्चाचा भार उचलत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.यावेळी त्यांच्या मातोश्री चंद्रकला मानकर,पत्नी दुर्वा मानकर,मुलगा पार्थ व मुलगी नेहा मानकर व विजय माळवदे आदी उपस्थित होते.
