ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद आंबोली मुळवंदवाडी शाळेचे यश

दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई

*💫आंबोली दि.१९-:* आंबोली येथील जिल्हा परिषद आंबोली मुळवंदवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत घवघवीत यश संपादन करत दोन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व एक कांस्यपदक पटकाविले. या परीक्षेत कुमार राजवीर विजय शिंदे (पहिली) ९८ टक्के गुण प्राप्त करत सुवर्ण पदक, कुमार विघ्नेश अरूण पाटील (तिसरी) ९६ टक्के गुणांसह सुवर्णपदक, कुमारी ईशिता तुळशिराम घुले हिने ९१ टक्के गुण मिळवत रौप्य पदक, कुमार लोकेश कुलभूषण परब (इयत्ता दुसरी) ८७ टक्के गुणांसह कांस्य पदक पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page