राजापूर येथे रिफायनरीचे समर्थन;प्रमोद जठार यांनी केले स्वागत
*💫कणकवली दि.१९-:* राजापूर येथे रिफायनरी समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्या सौ मंदाताई शिवलकर यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख सरपंच व शिवसैनिकानी भारतीय जनता पक्षात प्रदेश चिटणीस माजी आम. प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, राजापूर तालुकाध्यक्ष गुरव, श्री अनिल करंगुटकर, रवी नांगरेकर, जब्बार काझी, अमजद बोरकर, पंढरीनाथ आंबेरकर,राजा काजवे, ऍड सुशांत पवार, देवगड सभापती रवी पाळेकर, श्री उत्तम बिर्जे, इत्यादी उपस्थित होते.यावेळी मा जठार साहेबानी कोकणात रोजगार निर्मिती करणारा नानार रिफायनरी प्रकल्पाचे मंदाताई शिवलकर साथ देत होत्या त्यावेळी तेथील आमदार खासदार यांनी चपलेने मारण्याची भाषा केली हा एक स्त्री जातीचा अपमान आहे आणि जेव्हा जेव्हा स्त्री चा अपमान होतो तेव्हा नक्कीच रामायण महाभारत घडते !मंदाताई घाबरू नका भाजप आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आपले भारतीय जनता पक्षात स्वागत आहे ज्या शिवसेनेच्या आमदार खासदाराने आपला अपमान केला त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे!भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांचेच नव्हे तर कोकणातल्या गरीबाच्या घरातील मूलाबाळांना उद्योजक बनवायचे राणे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण आजपासून कामाला लागूंया!असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
