*💫कणकवली दि.१९-:* गझलभूषण कै. मधुसूदन नानिवडेकर यांना सांगली येथील शब्दवैभव साहित्य समूहातर्फे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या आठवणी जागवून व त्यांच्याच कविता, गझल सादर करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. साहित्यिक आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी नानिवडेकर यांच्या आठवणी सांगितल्या त्याचबरोबर ज्येष्ठ गझलकार सुधीर इनामदार, नरहर कुलकर्णी, प्रवीण पुजारी, डॉ. दयानंद काळे ,महादेव हवालदार यांनीही नानिवडेकर यांच्या आठवणी सांगितल्या.यांच्याबरोबरच कवयित्री शांता वडेर, सुधा पाटील, निलिमा ताटके, मनीषा रायजादे, सीमा पाटील, सारिका पाटील, राजश्री सूर्यवंशी, डॉ.स्वाती पाटील, सुमेधा दिवाण, मेहबूब जमादार,वैभव चौगुले, या सर्व कवी-कवयित्रींनी नानिवडेकर यांच्या कविता गझल सादर करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी दिपाली घाडगे, विनायक धानोरकर(गडचिरोली ), अविनाश शिंदे आदि साहित्यिक उपस्थित होते.. या शब्दश्रध्दांजलीचे आयोजन व सूत्रसंचालन समूह प्रशासक कवी-गझलकार वैभव चौगुले यांनी केले. ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा जीवनप्रवास कवयित्री गजलकारा मनीषा रायजादे यांनी सांगितला तर आभार कवयित्री सुधा पाटील यांनी मानले.
मधुसूदन नानिवडेकर यांना शब्दवैभव साहित्य समूह,सांगलीच्यावतीने शब्द श्रद्धांजली
