झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत वाहतुकीस सुरळीत

मुसळधार पावसामुळे मळगाव रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर कोसळले होते झाड

*💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी ७.३० च्या सुमारास मळगाव रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने मार्ग ठप्प झाला होता. दरम्यान वाहतुकीचा विचार करता हा महत्वाचा मार्ग असल्याने झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.

You cannot copy content of this page