सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १७ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यात आज १७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ४, सबनीस वाडा १, सालई वाडा २ तर ग्रामीण भागात कोल गाव ३, मळगाव २, आरोंदा १, कवठणी १, इन्सुली २,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 107 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 44 हजार 779 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 107 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सुधाताई वामनराव कामत अंगणवाडीमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

लहान मुलांनी विविध विविध वेशभूषा करीत केले अभिवादन *⚡सावंतवाडी ता.०१-:* स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा मंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 मधील छोट्या बालकाने साजरी केली. तनिष्क प्रशांत मेस्त्री याने…

Read More

वेंगुर्ले राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे नवाबाग येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

147 जणांनी घेतला लाभ* *⚡वेंगुर्ले दि.०१-:* राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट डॉक्टर सेल यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत व औषध उपचार हा कार्यक्रम पी.डब्ल्यू.डी. एम. एस. डी. मुंबई यांच्या सौजन्याने वेंगुर्ले येथील उभादांडा-नवाबाग शाळेमध्ये राबविण्यात आला. या आरोग्य शिबिरात 147 ग्रामस्थांनी लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या डॉक्टर सेलचे…

Read More

सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार

काँग्रेसच्या सावंतवाडी येथे झालेल्या तालुका बैठकीत एकमुखी ठराव *⚡सावंतवाडी ता.०१-:* आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा एक मुखी ठराव आज काँग्रेसच्या सावंतवाडी येथे झालेल्या तालुका बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे व महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी उपस्थित…

Read More

मळगाव ग्रामपंचायतमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

*⚡सावंतवाडी ता.०१-:* मळगाव ग्रामपंचायतमध्ये आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मळगाव सरपंच स्नेहल जामदार यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निलेश राऊळ, भालचंद्र सावंत व इतर उपस्थित होते.

Read More

एनडीआरएफ टीमचे काम कौतुकास्पद

परिचारीकांना सहा महिन्यांची नियुक्ती देण्याबाबत पाठपुरावा करणार :आम.दिपक केसरकर *⚡सावंतवाडी ता.०१-:* गाळेल येथे डोंगर खचून कोसळलेल्या मातीत अडकलेल्या वेंगुर्ला येथील युवकाचा सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर एनडीआरएफ टीमने शोध घेतला. एनडीआरएफ टीमचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद कार्य आहे त्यामुळे त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत आम.दिपक केसरकर यांनी आज येथे मांडले. यावेळी कोविड काळात…

Read More

नानेली येथे शिवशंभू संघटनेतर्फे पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू वाटप

*⚡मालवण ता.०१-:* ग्रामपंचायत नानेली येथे शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्त लोकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन सावंत जिल्हा उपाध्यक्ष अमर सावंत जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर कणकवली तालुकाध्यक्ष योगेश गावकर संघटनेचे सदस्य उमेश मांजरेकर तसेच कवटणकर सचिन तावडे अर्जुन मुळी समिधा तावडे प्राणेश नाईक सागर सावंत तसेच ग्रामपंचायत नानेली…

Read More

चिपळूणच्या महापूरात निरंकारी सेवादलांचे सेवेसाठी योगदान

स्वयंसेवक खाकी वर्दीमध्ये करत आहेत बाधित घरांची, रस्त्यांची साफसफाई *⚡कणकवली ता.०१-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात महापुराच्या पाण्याने नुकसान केले आहे. शेकडो दुकानांसह घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून तेथील घरांची व रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या चिपळूण झोनच्या अंतर्गत रत्नागिरी क्षेत्रातील सेवादलांची तुकडी पाणी ओसरल्यानंतर खाकी वर्दीमध्ये सेवा करीत…

Read More

पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीचे निधन

सावंतवाडी शहरातील घटना : परिसरात हळहळ *⚡सावंतवाडी ता.०१-:* शहरात आज काळजी पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे देखील दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी येथील बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते जयानंद मठकर यांचे सहकारी अशोक बांदेकर यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाला…

Read More
You cannot copy content of this page