सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार

काँग्रेसच्या सावंतवाडी येथे झालेल्या तालुका बैठकीत एकमुखी ठराव

*⚡सावंतवाडी ता.०१-:* आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा एक मुखी ठराव आज काँग्रेसच्या सावंतवाडी येथे झालेल्या तालुका बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे व महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी उपस्थित होत्या. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असून अलीकडच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वारंवार स्वबळाची भाषा केली असून सावंतवाडी येथे झालेल्या ठरावाला देखील विशेष महत्त्व आहे.

यावेळी तालुका सरचिटणीस अन्वर खान, तालुका प्रवक्ते अँड .संभाजी सावंत, तालुका उपाध्यक्ष आशोक राऊळ, समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे, ओबीसी सेल अध्यक्ष अभय मालवणकर, शहर अध्यक्ष राघवेंन्र्द नार्वेकर, संजय लाड, माया चिटणीस ,मनोहर राऊळ ,हर्षवर्धन धारणकर जासमिन लक्ष्मेश्वर, रुपेश आईर,समीर भाट, गोपाळ राऊळ, संतोष मडगावकर , बबन डिसोजा, अरुण नाईक , विनोद मल्लार , आनंद कुंभार, बबलू डिसोजा, राज पेंडणेकर, रमेश जाधव, मिनीन गोम्स, सुहास सावंत, विल्यम सालदाणा, सुरेश निर्गुण,रामचंद्र राऊळ , महेंद्र दुबळे व इतर बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page