एनडीआरएफ टीमचे काम कौतुकास्पद

परिचारीकांना सहा महिन्यांची नियुक्ती देण्याबाबत पाठपुरावा करणार :आम.दिपक केसरकर

*⚡सावंतवाडी ता.०१-:* गाळेल येथे डोंगर खचून कोसळलेल्या मातीत अडकलेल्या वेंगुर्ला येथील युवकाचा सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर एनडीआरएफ टीमने शोध घेतला. एनडीआरएफ टीमचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद कार्य आहे त्यामुळे त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत आम.दिपक केसरकर यांनी आज येथे मांडले. यावेळी कोविड काळात आरोग्य सेवा देणार्‍या परिचारीकांना सहा महिन्यांची नियुक्ती देण्याबाबत आपण आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही केसरकर यांनी दिले. यावेळी त्यांच्या हस्ते एनडीआरएफ टीमसह प्रांताधिकारी तहसीलदार आणी पाच नर्सचे कौतूक करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उपनिरीक्षक समिर भोसले आदी उपस्थित होते केसरकर म्हणाले, आमच्या एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अत्यसंस्कार केल्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही, असा समज आहे. त्यामुळे मृत गितेश गावडे याचा मृतदेह मिळेपर्यत शोध घेण्यात आला. यासाठी प्रयत्न करणार्‍या एनडीआर टिमसह प्रशासनाचे मी नक्कीच आभारी आहे. अशाप्रकारच्या आपत्कालीन घटनावेळी तात्काळ मदत होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक असलेले साहीत्य आपण यापूर्वीच उपलब्ध करून दिले असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. यावेळी एनडीआरएफचे अधिकारी यादव म्हणाले, येथील प्रशासन आणी विशेषतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या सहकार्यामुळेच आपण ही मोहीम यशस्वी करू शकलो असे त्यांनी सांगितले. यावेळ प्रतिक्षा नाईक, सर्वांगी राणे, करीष्मा तुळसकर, प्रिती पालव, प्रतिक्षा धुरी आदी परिचारिकांचा सन्मान करण्यात आला

You cannot copy content of this page