सुधाताई वामनराव कामत अंगणवाडीमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

लहान मुलांनी विविध विविध वेशभूषा करीत केले अभिवादन

*⚡सावंतवाडी ता.०१-:* स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा मंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 मधील छोट्या बालकाने साजरी केली. तनिष्क प्रशांत मेस्त्री याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची वेशभूषा परिधान करून त्यांना अभिवादन करत ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिशा सासोलकर प्रांजल मेस्त्री आदी उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यानी प्रसंगी मंडाले तुरुंगवास सहन करावा लागला स्वराज्य हे ब्रिटिशांना द्यावेच लागेल स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना त्यांनी केली यावेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या बद्दल माहिती अंगणवाडी सेविका सौ पवार यांनी दिली कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा अंगणवाड्या बंद आहेत कोरोना चे नियम पाळून या अंगणवाडीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला

You cannot copy content of this page