नारळ उत्पादकांना पाच वर्षांसाठी मोफत खत
बांदा/प्रतिनिधीनारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी नारळ विकास मंडळाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी मोफत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रति माड १२० रुपये किमतीचे खत मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम बांदा येथील सिंधुदुर्ग फळबागायतदार संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा….
