बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करा अन्यथा मालवणतील वीजेच्या खांबावर ट्यूब लाईट लावणार

युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिला इशारा *⚡मालवण ता.०८-:* गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना मालवण शहरातील स्ट्रीट लाईट बंद असून रस्त्यांवर छोटे मोठे खड्डे असल्याने नागरिकांना चालताना व गणपतीची मूर्ती घरी नेताना त्रास होणार असल्याने येत्या दोन दिवसात मालवणातील बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करावेत अन्यथा राष्ट्रीय युवक काँग्रेस कडून मालवण शहरातील वीजेच्या…

Read More

मालवणात वाहतूक नियमांचे उल्लंघन

२३३ वाहन चालकांवर ४८,५०० रुपयाची दंडात्मक कारवाई *⚡मालवण ता.०८-:* मालवण शहर आणि परिसरात धूम स्टाईल गाड्या चालविणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ऑगस्ट महिन्यात मालवणातील २३३ वाहन चालकांवर ४८,५०० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील २३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. मालवण…

Read More

कागदी लगद्यापासून बनविण्यात येणाऱ्या अशास्त्रीय गणेशमूर्ती बनविण्यावर कारवाई करा

हिंदू जनजागृती समितीतर्फे मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदन *⚡मालवण ता.०८-:* कागदी लगद्यापासून बनविण्यात येणाऱ्या अशास्त्रीय गणेश मूर्ती बनविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदन देण्यात आले. हिंदूंच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे अशास्त्रीय गणेश मूर्तीदान, कृत्रिम तलाव मूर्ती विसर्जन रोखण्यासाठी मालवणचे नगराध्यक्ष महेश…

Read More

दीपक गोसावी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

ओरोस-:५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी ता. मालवणचे उपशिक्षक दिपक गोसावी यांना कोल्हापूर आविष्कार फाउंडेशनचा 2021चा राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. अविष्कार फाउंडेशन शैक्षणिक व सामाजिक कार्यात जे उल्लेखनीय काम करतात त्याची या पुरस्कारासाठी निवड करतात. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षक कार्यरत…

Read More

मोदी एक्सप्रेसने आलेल्या चाकरमानी गणेशभक्तांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत

आमदार नितेश राणेंचे प्रवासी गणेशभक्तांननी मानले आभार *⚡कणकवली ता.०८-:* गणेश चतुर्थीनिमित्त गणेशभक्तांना कोकणात जाण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी गणेश भक्तांसाठी मोफत सोडलेल्या मोदी एक्स्प्रेस रेल्वेचे कणकवलीत स्वागत करण्यात आले. या रेल्वेतून प्रवास केलेल्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन कणकवलीत रेल्वे स्टेशनवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वागत केले. १८०० प्रवाशांना घेऊन ही रेल्वे कणकवलीत दाखल झाली. याठिकाणी चार एसटी…

Read More

वैभववाडीत नियमांची पायमल्ली करून कामे होत असल्याचा मनसेचा आरोप

मलीदा कोण खाते व कामे कशी बोगस होतात हे जाहीर करणार:सचिन तावडे *⚡वैभववाडी ता.०८-:* गेल्या आठ नऊ महिन्यापासून नगरपंचायत येथील प्रशासक म्हणून आपण काम पाहात आहात. प्रशासकाची भूमिका बजावताना तुमचे अधिकारी कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आपला अंकुश जाणवत नाही. वाभवे हे गाव इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रात येत असताना देखील येथे खाजगी विकास मोठ्या प्रमाणात…

Read More

कोरोनाच्या काळातही शैक्षणिक काम सुरू ठेवणाऱ्या शिक्षकांचा एस.आर. दळवी फाऊंडेशनकडून सन्मान

समाजसेवक रामचंद्र दळवी यांच्या तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराची घोषणा. *⚡कणकवली ता.०८-:* ज्या शिक्षकांनी जागतिक महामारी (कोव्हिड-१९) च्या काळातही निरंतर शिक्षणकार्य केले आणि नवकल्पना राबवित असंख्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन सुरू ठेवले अशा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजसेवक आणि एस.आर. दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी (आबा) यांच्यावतीने सदर शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती रामचंद्र…

Read More

पाडलोसमध्ये रस्त्यावर झाड कोसळले

*⚡बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यात आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून बांदा -शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने मार्ग वाहतुकीस बंद झाला होता. तर महावितरणचा एक खांब कोलमडून विद्युत वाहिन्या जमिनीवर आल्या. चिंचेचे झाड रस्त्यावर पडल्याने बांदा-शिरोडा महामार्गावरील एसटी वाहतूक दिवसभर ठप्प होती तर अन्य वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही…

Read More

कणकवलीत विनामास्क फिरणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई

*⚡कणकवली ता.०८-:* गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कणकवली दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येणारे काही नागरिक विनामास्क फिरत आहेत, तर काही व्यापारी देखील विनामास्क विक्री करत त्यांच्याविरुद्ध नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कणकवली शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आप्पासाहेब पटवर्धन चौकासह वर्दळीच्या ठिकाणी ही पथके तैनात ठेवली…

Read More

शेर्ले जुना कापई पूल पाण्याखाली

*⚡बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेर्ले जुना कापई पूल आज दुपारी पाण्याखाली गेला. जुलै महिन्यात आलेल्या महापुराची धास्ती कायम असल्याने ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी मात्र दक्षता बाळगण्याचे दिसून आले. सुमारे एक फूट पुलाच्यावर पाणी आल्याने बघ्यांची मात्र गर्दी झाली होती. दुपारी पुलावर आलेले पाणी उशिरापर्यंत कायम होते.

Read More
You cannot copy content of this page