कणकवलीत विनामास्क फिरणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाई

*⚡कणकवली ता.०८-:* गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कणकवली दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येणारे काही नागरिक विनामास्क फिरत आहेत, तर काही व्यापारी देखील विनामास्क विक्री करत त्यांच्याविरुद्ध नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कणकवली शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आप्पासाहेब पटवर्धन चौकासह वर्दळीच्या ठिकाणी ही पथके तैनात ठेवली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी अवधूत तावडे व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.चे कर्मचारी रवी म्हाडेश्वर, प्रशांत राणे, मनोज धुमाळे, संतोष राणे, सचिन तांबे, विजय चव्हाण, संजय राणे, वाहतूक पोलीस श्री. माने यांनी केली. गर्दीमुळे कोरोना फैलावू नये व खबरदारी म्हणून ही कारवाई नगरपंचायत प्रशासन व पोलिसांकडून केली जात अाहे.

You cannot copy content of this page