पाडलोसमध्ये रस्त्यावर झाड कोसळले

*⚡बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यात आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून बांदा -शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने मार्ग वाहतुकीस बंद झाला होता. तर महावितरणचा एक खांब कोलमडून विद्युत वाहिन्या जमिनीवर आल्या. चिंचेचे झाड रस्त्यावर पडल्याने बांदा-शिरोडा महामार्गावरील एसटी वाहतूक दिवसभर ठप्प होती तर अन्य वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून सुरू आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. झाड हटविण्यासाठी ग्रामस्थांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

You cannot copy content of this page