*⚡बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेर्ले जुना कापई पूल आज दुपारी पाण्याखाली गेला. जुलै महिन्यात आलेल्या महापुराची धास्ती कायम असल्याने ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनी मात्र दक्षता बाळगण्याचे दिसून आले. सुमारे एक फूट पुलाच्यावर पाणी आल्याने बघ्यांची मात्र गर्दी झाली होती. दुपारी पुलावर आलेले पाणी उशिरापर्यंत कायम होते.
शेर्ले जुना कापई पूल पाण्याखाली
