Headlines

पिकुळेच्या श्री शांतादुर्गा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

⚡दोडामार्ग ता.१७-: पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच प्रथम तीन क्रमांकासह विशेष प्राविण्य मिळवलेल्या ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅड. अनिल गवस, दोडामार्ग तालुका मुंबई…

Read Full News

तुळसचा ऐतिहासिक “श्री देव जैतीर उत्सव” मंगलमय वातावरणात संपन्न…

सोमवार 25 मे रोजी “कवळास” उत्सवाने होणार सांगता.. ⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र राज्यातजागृत देवस्थान अशी ख्याती पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध तुळस गावातील श्री देव जैतीर उत्सव भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. शनिवारी 16 मे रोजी हा प्रसिद्ध उत्सव संपन्न झाला, तर सोमवार 25 मे रोजी “कवळास ” उत्सवाने सांगता होणार आहे. येथील सर्व…

Read Full News

मळगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर राणेंचे शिवकार्याचे व्रत…

इतिहासाची साधने व प्रदर्शन’ उपक्रमाचे शतक पूर्ण.. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी शिवकार्याचा ध्यास घेत इतिहासाची साधने व प्रदर्शन हा उपक्रम यशस्वीपणे राबवित इतिहास शिक्षणाला नवे परिमाण दिले आहेत. आतापर्यंत या उपक्रमाचे तब्बल १०० पेक्षा अधिक कार्यक्रम झाले आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जीवंत इतिहासाचा अनुभव देणारा प्रेरणादायी उपक्रम…

Read Full News

कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यान महाविद्यालयच्या विद्यार्थीनी तेंडोलीत…

कुडाळ : उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने त्या या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जीवनाचा अभ्यास करणार आहेत.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शनिवारी तेंडोली ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच ऍड.अनघा तेंडोलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच…

Read Full News

ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा …

*खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सिधुदुर्गनगरी ता.१६-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या…

Read Full News

विशाल परब यांच्या उपस्थितीत आरवलीत बैलगाडा शर्यतीचा थरार उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१६-: आरवली सखेलखोल परिसरात श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण…

Read Full News

नेरुर येथे रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जागतिक परिचारिका दिनानिमित्त नाईक रुग्णालयात आयोजन.. ⚡कुडाळ ता.१६-: जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय नेरुर येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्त दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.१२ मे हा दिवस आद्य परिचारिका क्षेत्राच्या जनक फ्लॉरेन्स नाईन्टीगल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगात परिचर्या क्षेत्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य…

Read Full News

शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जि. प. समोर ठिय्या आंदोलन…

​महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा थेट इशारा:उपसचिव मो. बा. ताशिलदार यांच्यावरही गंभीर आरोप.. ​⚡कुडाळ ता.१६-: वैभववाडीतील एका गरीब विधवा महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षक मान्यतेसाठी पैसे देण्यास भाग पाडणाऱ्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. शिक्षण उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी कविता शिंपी यांना ‘क्लीन चिट’ देत त्यांना…

Read Full News

एसटीच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा…

लाखोंचे सोन्याचे ब्रेसलेट केले सुपूर्द ⚡कणकवली ता.१६-: सावंतवाडी – कणकवली मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रामाणिकपणे जमा करून महिला वाहकाने आदर्श प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. एसटीच्या सावंतवाडी-कणकवली बसमध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहक जे. व्ही. कदम यांना बसमधील सीटवर सोन्याचे ब्रेसलेट आढळून आले. त्यांनी कोणताही मोह न बाळगता ते तात्काळ आपल्या…

Read Full News

धाकोरे परिसरात अवैध मांस तस्करीच्या संशयावरून थरार…?

नील प्रभू झांट्ये व रूपम प्रभू झांट्ये यांच्या धाडसाचे सर्वत्र होतय कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आजगाव धाकोरे परिसरात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवैध मांस वाहतूक करणारा संशयित व त्या संशयिताला पकडण्यासाठी पाठलाग करणारे शिव प्रतिष्ठान चे धारकरी नील प्रभू झांट्ये व रूपम प्रभू झांट्ये यांच्यात एक थरारक घटना घडली आहे. संशयास्पद मांसाची वाहतूक करणाऱ्या एका…

Read Full News

You cannot copy content of this page