नवीन डॉक्टर मिळेपर्यंत बदली झालेल्या डॉक्टरांना सोडू नका
आरोग्य समिती सभेत निर्णय *⚡सिंधुदुर्गनगरी ता २१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टरांची ५० टक्के हून अधिक पदे रिक्त असल्याने जोपर्यंत नवीन डॉक्टर येत नाहीत तोपर्यंत बदली झालेल्या कार्यरत डॉक्टरांना कार्यमुक्त करू नये, तसेच त्यांचे वेतन रोखण्यात येऊ नये. असा ठराव आजच्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती डॉ.अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली…
