मेडिकल कॉलेजला एनएमसीची मान्यता दिल्याबद्दल अमित देशमुख यांच्यामुळेयुवक काँग्रेसने केली होती मागणी

प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची माहिती

*⚡मालवण ता.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट घेत लक्ष वेधले होते. जिल्ह्यात ओरोस येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी सत्यात उतरली असून यासाठी जागा निश्चित करून आवश्यक निधी देऊन आता केंद्रातून परवानगी देखील मिळवून दिला बद्दल युवक काँग्रेस तर्फे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे मानले आभार मानण्यात आल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या जिल्ह्यात व्हावे यासाठी तत्कालीन माजी मंत्री स्व.भाई सावंत यांनी प्रथम प्रयत्न केले होते. त्यानंतर स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर देखील तत्कालीन पदाधिकारी यांनी चर्चा केली होती. अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षण मंत्री होताच त्यांची मुंबईत मंत्रालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस शिष्टमंडळातर्फे आपण देवानंद लुडबे यांच्यासोबत जाऊन भेटून पत्र देखील देण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी ही पूर्वी पासून काँग्रेसचीच आहे, असेही अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे. त्यांनतर मंत्री अमित देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून जिल्हा प्रशासनास तातडीने जागा निश्चित करुन अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले होते व त्यानंतर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक देखील मंत्रालयात घेण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता केंद्र शासनाच्या एन.एम.सी. (नॅशनल मेडिकल कामिशन) ची मान्यता मिळाली आहे हे यश जिल्हावासीयांचेच आहे. लवकरच हे महाविद्यालय सुरु होणार असून या विद्यालयामध्ये एम.बी.बी.एस.च्या १०० जागा भरल्या जाणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच देखील स्वप्न पूर्ण होणार आहे. महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला असून याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पालकमंत्री उदय सामंत यांचे सुद्धा जिल्हा युवक काँग्रेसने आभार मानले आहेत असेही अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page