*⚡मालवण ता.२१-:* जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग याच्यामार्फत विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मालवण कोळंब येथे केक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केक व्हेज असावा, डेकोरेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू खाण्यायोग्य असाव्यात. पर्यटन या विषयावर केक बनविण्यात यावा, केकचा प्रकार व बनविण्याची माहिती केक सोबत ठेवावी. केक घरी बनवून आणावा. केक बनविताना कमीत कमी दोन मिनिटांचा व्हीडिओ असावा. प्रथम तीन विजेत्यांना ५००१, ३००१, १५०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील. इच्छुकांनी दि. २५ सप्टेंबर पर्यंत नावे नोंदवावीत. अधिक माहिती साठी ९४२११५३०३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धाचे आयोजन
