*⚡मालवण ता.२१-:* मालवण दांडी येथील तरुण दशावतार कलाकार विनायक उर्फ गोट्या येरागी याला पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशनचा यावर्षीचा युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दांडी येथील मालवण नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सेजल परब यांनी विनायक याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले. दशावतार कलेतील विनायक याच्या कामगिरीचे सौ. परब यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संमेश परब आदी व इतर नागरिक उपस्थित होते.
दशावतारी कलाकार विनायक येरागी याचा सत्कार
