खारेपाटण मध्ये शासनाच्या “ई पीक पाणी योजनेविषयी” मार्गदर्शन
*⚡कणकवली ता.२१-:* कोकणातील शेतकरी वर्ग हा आपल्या शेत जमिनीत विविध फळ बागायती झाडे लावतो. तसेच भात शेती पिकवत असतो मात्र त्याची रीतसर नोंद आपल्या जमिनीच्या सातबारा मध्ये पीक पाणी मध्ये न केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना शासनाची मदत असून देखील त्याचा लाभ त्यांना मिळत नाही.त्यामुळे शासनाच्या ई पीक पाणी योजनेचा शेतकऱ्यानी लाभ घेतल्यास शेतकरी वर्गाचा खऱ्या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. महाराष्ट्र शासन महसूल विभाग कणकवली यांच्यावतीने खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे शासनाच्या ई पीक पाणी योजने विषयी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे असयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेला कणकवली तहसीलदार आर. जे. पवार,खारेपाटण तळेरे मंडल अधिकारी संतोष नागवकर,तांत्रिक सह्ययक बाजीराव काशीद, खारेपाटण ग्रा.पं. सदस्य योगेश पाटणकर,तलाठी के. सिंगनाथ ,ग्रा .प.लिपिक शैलेंद्र शेट्ये,कोतवाल प्रथमेश गुरसळे आदी अधिकारी व पदाधिकारी यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “ई पीक पाणी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेत पीकांची माहिती स्वतः भरल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता येऊन शासनाला पीक पाण्याची विस्तृतवार अधिकृत आकडेवारी मिळते.तसेच शेतकऱ्याला त्याच्या पिकाची योग्य नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.व पीक विमा योजनेचा लाभ देखील सहज मिळून जातो.याबरोबरच शेतकऱ्यांना गरजेला हवं असणार शेती कर्ज देखील मिळण्यास मदत होते.त्यामुळे शासनाचे योग्य शेती आर्थिक धोरण ठरविण्यासाठी ई पीक पाणी अँप डाउनलोड करून स्वतःच्या पिक पाण्याची नोंद स्वतः करा. आणि शासनाच्या मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्या.” असे आवाहन कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटण येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी तहसीलदार पवार यांनी खारेपाटण येथे प्रत्यक्ष भातशेतीच्या बांधावर जाऊन मोबाइल द्वारे ई पीक पाणी अँप कसे डाउनलोड करायचे याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.यासाठी तांत्रिक सह्ययक बाजीराव काशीद व मंडल अधिकारी संतोष नागवकर यांनी देखील शेतकऱ्यांना ई पीक पाण्याची नोंद मोबाइल वर कशी भरायची याविषयी अधिक माहिती दिली. कणकवली तहसीलदार यांनी खारेपाटण सह कणकवली तालुक्यातील शिडवणे व फोडघाट या गावांना भेटी देत येथील शेतकऱ्यांना देखील ई पीक पाणी योजने विषयी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले.
