जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 423.7950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.73 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 87.9500, अरुणा – 78.9433, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

देवगड तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 34.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3765.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 21(3669), सावंतवाडी –…

Read More

तोरसे अपघातात कुडाळचा युवक जागीच ठार

*⚡बांदा ता.२३-:* मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे बीएड कॉलेजनजीक धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या योगेश परब (वय २७, रा. कुडाळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला. गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्या दुचाकीची समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोला धडक बसल्याने योगेश मागमार्गावर कोसळला….

Read More

सावंतवाडीत परप्रांतीयांची नोंदणी नाही

मुख्यमंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष;मनसेच्या गुरुदास गवंडे यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष *⚡सावंतवाडी ता.२३-:* महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व परप्रांतीय लोकांचे नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असताना देखील सावंतवाडी तालुक्यात त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. ही अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.

Read More

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी पर्यटन दिन होणार साजरा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन मालवण दि प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने कोळंब येथील स्वामी समर्थ हॉल येथे पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार…

Read More

नळपाणी योजनेसाठी येत्या दोन दिवसात विज जोडणी द्या

सभापती अजिंक्य पाताडे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना मालवण दि प्रतिनिधी मालोंड बेलाचीवाडी येथील लोकांना गेले दोन-तीन महिने पावसाचे पाणी प्यावे लागत आहे. वाडीसाठी बनविण्यात आलेल्या नळपाणी योजनेस वीज जोडणी न दिल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या नळपाणी योजनेस वीज जोडणी द्या अशा सूचना सभापती अजिंक्य पाताडे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना केली….

Read More

“माझ्या देवाक काळजी रे” मालवणी नाटक वर्ष अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला…

गीतांजली प्रोडक्शनची निर्मिती : मालवणी नटसम्राट लवराज कांबळी यांची माहिती *⚡वेंगुर्ले ता.२२-:* प्रदीर्घ विश्रांती नंतर गीतांजली प्रोडक्शन निर्मित “माझ्या देवाक काळजी रे” हे मालवणी नाटक नाट्य थिएटर सुरू होताच या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सातत्याने दोन वर्षे कोरोनाचा फटका मराठी रंगभूमी व सिनेसृष्टीला बसला. असे असले तरी हे मालवणी…

Read More

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी

काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांची राज्याचे ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव यांच्याकडे मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवणात वीज वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली बाबत चुकीची कार्यवाही सुरू असून ग्राहकांना कोणतीही नोटीस न देता वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री व…

Read More

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी कार्यक्रमाचा २५ रोजी शुभारंभ

*⚡मालवण ता.२२-:* बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांना २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याचा शुभारंभ २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून साथी प्रा. आनंद मेणसे हे ‘बॅ. नाथ पै व्यक्ती व विचार’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रा. मेणसे यांच्या…

Read More

परप्रांतीय कामगारांचे लसीकरण करणार

सभापती अनिशा दळवी : प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात लस घेण्याचे केले आवाहन *⚡दोडामार्ग ता.२२सुमित दळवी-:* जिल्ह्यात रेल्वे, बिल्डींग व अन्य बांधकाम खाण व्यवसाय व खाद्यपदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे ज्या कामगाराना आपली कोव्याक्सीन,कोविडशिल्ड लस घ्यावयाची आहे त्यानीआधार किंवा अन्य कोणताही पुरावा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा…

Read More
You cannot copy content of this page