*⚡मालवण ता.२२-:* बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांना २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याचा शुभारंभ २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून साथी प्रा. आनंद मेणसे हे ‘बॅ. नाथ पै व्यक्ती व विचार’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रा. मेणसे यांच्या ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ‘बॅ. नाथ पै’ या पुस्तकाच्या लेखिका अदिती पै यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. बॅ. नाथ पैप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून होणार आहे.
बॅ. नाथ पै जन्मशताब्दी कार्यक्रमाचा २५ रोजी शुभारंभ
