गीतांजली प्रोडक्शनची निर्मिती : मालवणी नटसम्राट लवराज कांबळी यांची माहिती
*⚡वेंगुर्ले ता.२२-:* प्रदीर्घ विश्रांती नंतर गीतांजली प्रोडक्शन निर्मित “माझ्या देवाक काळजी रे” हे मालवणी नाटक नाट्य थिएटर सुरू होताच या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सातत्याने दोन वर्षे कोरोनाचा फटका मराठी रंगभूमी व सिनेसृष्टीला बसला. असे असले तरी हे मालवणी नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरतेल, असा विश्वास मालवणी नटसम्राट लवराज कांबळी यांनी वेंगुर्ला सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मालवणी नटसम्राट दिवंगत मच्छिद्र कांबळी यांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली. पण मच्छिद्र काबळी यांच्या वस्त्रहरण या मालवणी नाटकाची नशा आज ही प्रेक्षकांना चढते. त्यावेळी तात्या व गोप्याच्या जोडीमुळे वस्त्रहरण नाटक अधिक गाजले. आज ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यातील गोप्याची भूमिका साकारणारे लवराज कांबळी व त्याची सहचारिणी अभिनेत्री गीतांजली कांबळी यांनी मालवणी नाटकातुन मालवणी भाषा जिवंत ठेवली. परंतु सही रे सही फेम गीतांजली कांबळी यांच्या अचानक निधना नंतर त्यांच्या निर्मितीची जबाबदारी अधुरी राहिली. आता मालवण येथील मिनू देऊलकर यांनी ही जबाबदारी घेत व्यावसायिक रंगभूमीवर मालवणी नाटक निर्मितीचे धाडसी पाऊल टाकले आहे. त्यांच्या निर्मितीतून मालवणी नाटक लवकुश प्रस्तूत निर्माता लवराज कांबळी व वस्त्रहरण फेम संजीवनी जाधव, दिगददर्शक राजू रेवडकर ,ट्रिकसिन वैभव पारकर, लेखक विराज कांबळी, नेपथ्य अंकुश कांबळी याचे लाभले आहे. तर कलाकार विजयालक्ष्मी, ऋतिका शेट्ये सह काही जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे. सध्या कोरोना काळात व्यवसाय बंद पडलेत रोजगार गेले त्यामुळे चाकरमानी मूळ गावी येऊ लागले. गावच्या जमिनी व मूळपुरुष याची आठवण पुन्हा त्यांना होऊ लागली आहे, हीच थीम घेत मुळातच आपल्या मूळपुरुषाचा विसर पडू देऊ नका हा संदेश देणारे मालवणी थमाल विनोदी नाटक प्रदीर्घ विश्रांतीने येत आहे. या नाटकाच्या रियलसर या मुबई येथेच होणार आहेत. मालवणी नाटकाला प्रेक्षक दाद देतील. दरम्यान प्रथम दिवंगत अभिनेत्री गीतांजली कांबळी यांच्या वाढदिवस दिनी नवीन मालवणी नाटक “माझ्या देवाक काळजी रे” याचे क्रोमोप्लेक्सचे अनावरण वेंगुर्ला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम दिवंगत अभिनेत्री गीतांजली कांबळी याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी वेंगुर्ला पत्रकार संघ माजी अध्यक्ष दिवगत संजय मालवणकर यांच्याहीआठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्या समवेत रामदास पारकर व जादूगार वैभवकुमार उपस्थती होते.
