तोरसे अपघातात कुडाळचा युवक जागीच ठार

*⚡बांदा ता.२३-:* मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे बीएड कॉलेजनजीक धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या योगेश परब (वय २७, रा. कुडाळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला. गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्या दुचाकीची समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोला धडक बसल्याने योगेश मागमार्गावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांसाह पेडणे (गोवा) पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page