देवगड तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 34.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3765.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 21(3669), सावंतवाडी – 17(4044.1), वेंगुर्ला – 44.6(3029.8) कुडाळ – 31(3661), मालवण – 45(4054.96), कणकवली – 26(4102), देवगड – 53(3279), वैभववाडी – 41(4283) पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page