संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्चचा 29 रोजी बक्षीस वितरण समारंभ

*⚡कणकवली ता.२५-:* कोवीड१९ प्रादुर्भाव कमी झाल्याने व पालकांच्या विनंतीवरून युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च २०२० चा बक्षीस वितरण समारंभ बुधवार २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. युवा…

Read More

शिरोडा येथील ई पिक – सातबारा नोंदणी संदर्भात तहसीलदार प्रविण लोकरे यांचे सभेद्वारे मार्गदर्शन

*⚡वेंगुर्ले ता.२५-:* शिरोडा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या ई पिक – सातबारा नोंदणी संदर्भातील कार्यक्रमात वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समस्यांचे निवारण केले. शासनाच्या आदेशानुसार सद्या सर्वत्र “ई पीक” पहाणी कार्यक्रम हाती घेऊन त्या बाबत गावागावात सभा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरोडा ग्रामपंचायत मध्ये मार्गदर्शन सभा…

Read More

शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली माहिती *⚡सावंतवाडी ता.२५-:* तिन काळे कृषी कायदे मागे घ्यावेत व शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा यासाठी संपूर्ण भारतात शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी प्रसिद्धीस…

Read More

देवगड तालुक्यामध्ये वेब मालिकेचे चित्रीकरण

देवगडचे निसर्गसौंदर्य भुरळ पडणारे- दिग्दर्शक अमित कोळी *⚡देवगड ता.२५-:* देवगड तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला पर्यटकांना आकर्षित करणारा,असून या तालुक्यात गेले चार ते पाच दिवस वेब मालिकेचे चित्रीकरण चालू होते. पाच भागांची ही वेब मालिका असून ’13 डेज ऑफ लव’ असे त्याचे नाव असणार आहे. गणराज प्रोडक्शन या बॅनरखाली ही वेब मालिक बनत असून श्रेयश जाधव…

Read More

नाम.सतेज ऊर्फ बंटी पाटील २७ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर

जिल्ह्याच्या विकासासाठी आढावा बैठका घेणार:बाळा गावडे *⚡सावंतवाडी ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस संपर्क मंत्री तथा राज्याचे गृह ( शहर), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे २७ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी आढावा बैठका घेण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

Read More

ठाकरे सरकारच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्याला तीन रुग्णवाहिका प्रदान

आमदार दीपक केसरकर यांचे प्रयत्न; तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.२५-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी तीन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी तसेच निरवडे व सांगेली ग्रामीण रुग्णालय अशा तीन रूग्णवाहीका मिळाल्याने रुग्णांची गैरसोय टळेल, असे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे.तसेच यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ७१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९हजार १९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

दोडामार्ग तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेस बळकटी

आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी; प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकटला नवीन रुग्णवाहिका *⚡दोडामार्ग ता.२५सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथील रुग्णवाहीका या जुन्या असल्याने आरोग्यसेवेत बऱ्याच अडचणी येत आहेत.याचा विचार करत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिशा दळवी या प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथे…

Read More

नेरूर गोवेरी भगतवाडी शाळेस गंगाराम सडवेलकर यांचेकडून भेटवस्तू प्रधान

*⚡कुडाळ ता.२५-:* शिक्षक दिनाचे ओचित्य साधून गोवेरी भगतवाडी शाळेस श्री.गणेश सडवेलकर गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगाराम सडवेलकर यांनी दोन स्टील कपाटे भेट स्वरूपात दिली. यावेळी व्यासपीठावर माजी पं.स.सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळी क्रेंदबल गटाचे क्रेंद्रप्रमुख वासुदेव मराठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक शिक्षक संघ सदस्य, प्रशालेचे सर्व शिक्षक उपस्थित होते….

Read More

गणपती सजावटीतील निर्माल्याचा उपयोग गांडूळ खतासाठी

न्हावेली ग्रामपंचायतचा पुढाकार : स्वच्छतेचा दिला संदेश *⚡बांदा ता.२५-:* गणेशोत्सवातील सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न न्हावेली गावचे रहिवासी चंद्रकांत राजाराम पार्सेकर यांनी केला. प्रशासनाच्या पर्यावरण सूचनांचे पालन करत न्हावेली ग्रामपंचायतीने त्याची दखल घेत पाहणी करत निर्माल्य टाकण्यासाठी साहित्य प्रदान केले. तसेच त्या निर्माल्याचा वापर गांडूळ खतासाठी होणार असल्याची माहिती न्हावेली सरपंच…

Read More
You cannot copy content of this page