*⚡कणकवली ता.२५-:* कोवीड१९ प्रादुर्भाव कमी झाल्याने व पालकांच्या विनंतीवरून युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च २०२० चा बक्षीस वितरण समारंभ बुधवार २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्यावतीने ९ फेब्रुवारी २०२० रोजी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत ५४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल एप्रिल २०२० मध्ये जाहीर करण्यात आला होता मात्र कोवीड १९ प्रादुर्भावामुळे बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला नव्हता. या बक्षीसवितरण समारंभात ३री, ४थी, ६वी व ७ वी मधील सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची रोख बक्षिसे, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ६वी व ७वी मधील जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवललेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२०चे वितरण होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन जि प सिंधुदुर्ग अध्यक्षा तथा युवा संदेश प्रतिष्ठान अध्यक्षा सौ. संजना संदेश सावंत, व संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे. अधिक माहिती साठी सुशांत मर्गज, परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च (९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्चचा 29 रोजी बक्षीस वितरण समारंभ
