*⚡वेंगुर्ले ता.२५-:* शिरोडा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या ई पिक – सातबारा नोंदणी संदर्भातील कार्यक्रमात वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समस्यांचे निवारण केले. शासनाच्या आदेशानुसार सद्या सर्वत्र “ई पीक” पहाणी कार्यक्रम हाती घेऊन त्या बाबत गावागावात सभा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरोडा ग्रामपंचायत मध्ये मार्गदर्शन सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना तहसीलदार श्री. लोकरे यांनी मार्गदर्शन करताना ही नोंदणी कशी महत्वाची आहे, हे समजावून सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत तलाठी श्री. खान, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, सदस्य राहुल गावडे, कौशिक परब, तसेच दिलीप गावडे, दत्तगुरु परब, विजय पडवळ, महादेव नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरोडा येथील ई पिक – सातबारा नोंदणी संदर्भात तहसीलदार प्रविण लोकरे यांचे सभेद्वारे मार्गदर्शन
