नेरूर गोवेरी भगतवाडी शाळेस गंगाराम सडवेलकर यांचेकडून भेटवस्तू प्रधान

*⚡कुडाळ ता.२५-:* शिक्षक दिनाचे ओचित्य साधून गोवेरी भगतवाडी शाळेस श्री.गणेश सडवेलकर गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगाराम सडवेलकर यांनी दोन स्टील कपाटे भेट स्वरूपात दिली. यावेळी व्यासपीठावर माजी पं.स.सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळी क्रेंदबल गटाचे क्रेंद्रप्रमुख वासुदेव मराठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक शिक्षक संघ सदस्य, प्रशालेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरुन गंगाराम सडवेलकर म्हणाले शाळेच्या सुविधा बाबत शाळेतील सर्व शिक्षक जागुत आहेत.शाळा व्यवस्थापन समिती, पालक ग्रामस्थांच्या वतीने अधिकाअधिक शाळेच्या सुविधा पुर्णत्वास आणाव्यात असे सुचित केले.तसेच भविष्यात अशा काही शालेय सुविधासाठी माझा मदतीची गरत भासल्यास जरुर सांगावे असे सांगितले. ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असल्याने शिक्षकांनाही सडवेलकर यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या वतीने गंगाराम सडवेलकर यांचा शाल श्रीफळ, पुपगुच्छ ,आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्री गणेश सडवेलकर यांना पण वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने भेट वस्तू व अभिष्टचिंतन पत्र देण्यात आले. कार्यक्रम कोरोनो सर्व नियम पाळून संपन्न झाला.

You cannot copy content of this page