गणपती सजावटीतील निर्माल्याचा उपयोग गांडूळ खतासाठी

न्हावेली ग्रामपंचायतचा पुढाकार : स्वच्छतेचा दिला संदेश

*⚡बांदा ता.२५-:* गणेशोत्सवातील सजावटीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न न्हावेली गावचे रहिवासी चंद्रकांत राजाराम पार्सेकर यांनी केला. प्रशासनाच्या पर्यावरण सूचनांचे पालन करत न्हावेली ग्रामपंचायतीने त्याची दखल घेत पाहणी करत निर्माल्य टाकण्यासाठी साहित्य प्रदान केले. तसेच त्या निर्माल्याचा वापर गांडूळ खतासाठी होणार असल्याची माहिती न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांनी दिली. न्हावेली ग्रामपंचायत प्रशासनाने पार्सेकरवाडी येथील श्री.पार्सेकर यांच्या घरी जात सजावटीची पाहणी केली. यावेळी स्वच्छतेचा संदेश देताना त्या बोलत होत्या. उपसरपंच विठोबा गावडे, माजी सरपंच शरद धाउसकर, ग्रामसेवक तृप्ती राणे व सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page