शेठ म. ग. हायस्कूल येथे डॉ.पूजा मालपेकर यांनी मुलींसाठी शारिरीक व मानसिक बदलाबाबत केले मार्गदर्शन

देवगड (प्रतिनीधी) : शेर मग हायस्कूल, देवगडू येथे उत्कर्षातंर्गत इ. १०वी व १२वी च्या मुलींसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन वर्गात डॉ सौ पूजा मालपेकर (पडेल) यांनी मुलींसाठी शारिरीक व मानसिक बदलाबाबत मार्गदर्शन केले. सुरवातीस मा. मुख्याध्यापक श्री संजीव राऊत यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तसेच मुलींच्या विविध समस्यांवर आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. आपले विचार व्यक्त करताना डॉ सौ पूजा मालपेकर यांनी ‘मासिक पाळी म्हणजे काय हे आकृतीद्वारे मुलींना स्पष्ट केले. मासिक पाळी संदर्भात असणारे गैरसमज सांगितले. आपल्या ज्या रूढी-परंपरा या दिवसातील आहेत त्यामागची वैज्ञानिक कारण-मिमांसा स्पष्ट केली. बदललेल्या जीवनशैलीचा मासिक पाळीवर होणारा परिणाम स्पष्ट केला. याप्रसंगी असणा-या मानसिक अशिग्याचाही विचार करणे गरजेचे आहे. या वयान भावनेच्या भरात निर्णय घेणे चुकीचे आहे तसेच मोबाईलचे आपण गुलाम न होना स्वामी व्हायला शिकले पाहिजे हे सांगितले. याप्रसंगी लक्ष केंद्रित होण्यासाठी व्यायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले. शेवटी मुलींच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निशा दहिबावकर यांनी केले व आगार सौ. आश्नी बोन यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page