ठाकरे सरकारच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्याला तीन रुग्णवाहिका प्रदान

आमदार दीपक केसरकर यांचे प्रयत्न; तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.२५-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी तीन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी तसेच निरवडे व सांगेली ग्रामीण रुग्णालय अशा तीन रूग्णवाहीका मिळाल्याने रुग्णांची गैरसोय टळेल, असे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे.तसेच यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न केले असे ते म्हणाले. राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १४ रुग्णवाहिका मंजूर झालेल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य आपत्ती व्यवस्थापन, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांचे विशेष प्रयत्न आहेत. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे व सांगेली ग्रामीण रुग्णालया सह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार दिपक केसरकर यांनी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत यांनी सहकार्य केल्यामुळे या रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने जनतेच्या वतीने सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत असल्याचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page