कणकवली, वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 9 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3894.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कणकवली – 9 (4214), वैभववाडी…

Read More

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे सायकल रॅली संपन्न

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* महात्मा गांधी जयंती निमित्त तसेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित जिल्हा न्यायालय ते ओरोस फाटा सायकल रॅली संपन्न झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.वी. हांडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी जिल्ह्या न्यायाधिश – 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.बी.रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम.फडतरे, जिल्हा विधी…

Read More

फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागा

वकील सुमित जाधव यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी सध्याच्या जमान्यात बाजारपेठेतील वस्तूंच्या विक्री बरोबरच वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीचा फंडा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बहुतांश वेळा ऑनलाइन वस्तू खरेदीत ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ऑनलाइन वस्तू विक्री बाबत ग्राहकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून शॉप ऍक्ट अंतर्गत जी दुकाने किंवा संस्था किंवा कंपन्या यांच्याकडून वस्तूची…

Read More

गिरणी कामगारांचा हक्काचा माणूस गेला

दिलीप कुडाळकर यांच्या निधनाने गिरणी कामगार पोरके झाले वैभववाडी प्रतिनिधी गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे मिळवून देण्यासाठी लढणारे लढाऊ नेते दिलीप कृष्णाजी कुडाळकर (वय ४७) यांचे आज मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात अल्पशा (कोरोना) आजाराने सकाळी निधन झाले. मुळ तिथवली, ता. वैभववाडी येथील मुळ गावी ते गेले काही दिवस पत्नी व मुलासह ते राहत होते. हरितालिका…

Read More

वैभववाडी-गगनबावडा रस्त्याची चाळण

अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. करूळ जामदारवाडी ते घाटपायथा दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून चालणेही मुश्कील बनले आहे. या मार्गावरून जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मोठ्या खड्यामुळे वाहने मार्गात अडकुन पडण्याच्या घटना…

Read More

कणकवली-जांभवडे बसफेरीमुळे प्रवाशांत समाधान

वैभववाडी प्रतिनिधी कणकवली जांभवडे ही सकाळी कुसूर गवळवाडी मार्गे जाणारी एस.टी.बस आखवणे भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाणात व्हाया करीत आहे.या बस फेरीमुळे पुनर्वसन गावठाणासह मांगवली गावातील प्रवाशांची सोय होणार आहे.याबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुनर्वसन गावठाणातून सकाळच्या सञात भुईबावडा,जांभवडे , पाचल परिसरात जाणे येण्यासाठी एस.टी.बस नव्हती.तसेच सकाळी ९ वा.नंतर वैभववाडीकडे जाणारी एस.टी.बस नव्हती.त्यामुळे पुनर्वसन…

Read More

रस्त्यावरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असताना ठेकेदारावर कारवाई का नाहीत

स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. महेंद्र नाटेकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.०१-:* रस्त्यावरील खड्डे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असून संबंधितांवर कठोर कारवाई का केली जात नाही ? ही कारवाई न झाल्याने या भ्रष्टाचाराला राजाश्रय आहे असे समजून तो अधिकच फोफावतो आहे , असे स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. महेंद्र नाटेकर यांनी हल्लाबोल केला. स्वतंत्र कोकणची…

Read More

कणकवली शहरातील ढालकाठी येथील सुमती वाळके यांचे निधन

*⚡कणकवली ता.०१-:* कणकवली शहरातील ढालकाठी येथील रहिवासी श्रीमती सुमती सहदेव वाळके (91) यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराजा हॉटेलमध्ये त्या स्वतः विविध खाद्यपदार्थ तयार करीत असत. स्वादिष्ट वडापाव बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. हा वडापाव खाण्यासाठी हॉटेल महाराजामध्ये कणकवली वासिया सोबतच विद्यार्थी…

Read More

४२ जणांनी केले रक्तदान

एकता मित्रमंडळ व रोटरी क्लबचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठ येथील एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांनी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त ओरोस ब्लड बँकेच्या मागणी नुसार आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रातदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा केला. या शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे…

Read More

बँक आपली आहे असे वाटण्यासाठी ग्राहकांना सेवा दिली

सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमात आनंद प्रभूवालावलकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी बँकेची नोकरी करताना अनेक माणसे भेटली खूप काही शिकता आले, अनेक चढउतार पाहिले बँकेत आलेला ग्राहक हा नाखूष होऊन जाता कामा नये तर त्या ग्राहकाला बँक ही आपली बँक आहे असे वाटले पाहिजे या दृष्टीने आपण बँकेला कुटुंब माणून जाणीवपूर्वक काम केले. बँकेच्या सेवा काळात…

Read More
You cannot copy content of this page